गुजरातचा महासंग्राम; मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केले मतदान

गुजरातचा महासंग्राम; मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केले मतदान

वृत्तसंस्था, गांधीनगर

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात आज 89 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय.

यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे.

दरम्यान, मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागा असून, त्यांपैकी पहिल्या टप्प्यात 89 मतदान होतंय.

या फेरीत एकूण 977 उमेदवार रिंगणात असून, 2 कोटी 12 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पहिल्या फेरीत मुख्यमंत्री विजय रुपानी, काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल आणि परेश धानानी यांचा कस लागणारेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version