राहुल यांना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका

राहुल यांना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका

गुजरात, ७ जुलै २०२३,प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालायने मोठा दणका दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणावरील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. त्याचबरोबर राहुल गांधींना सुनावण्यात आलेली दोन वर्षांची शिक्षाही कायम राहणार आहे.

राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ‘मोदी चोर है’ या शब्दांचा वापर केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी या मानहानी प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी गुजरात हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने राहुल गांधींची ही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. गुजरात हायकोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी ८ वर्षांसाठी रद्दच राहणार आहे. तसेच कोर्टाने २ वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

  • काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ‘सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका केली होती. यानंतर भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता.
  • दरम्यान, राहुल गांधी यांना या प्रकरणी सूरत येथील सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व (खासदारकी) रद्द केले होतं. यामुळे राहुल गांधी यांना ८ वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version