गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात

गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात

वृत्तसंस्था, गांधीनगर

भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 93 जागांसाठी 851 मतदार रिंगणात असून भाजपसमोर आव्हान उभे करणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी यांचेही भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलंय. राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता.

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली आहे. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये ३० पेक्षा जास्त प्रचारसभा घ्याव्या लागल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version