वृत्तसंस्था, नवी दिल्ली
66 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.
133 वस्तूंवरील जीएसटीचा कराचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 66 वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय कौन्सिलने घेतल्याची माहिती
अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली.
नवीन निर्णयानुसार जीएसटीमध्ये झालेले बदल
– 100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के
– 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के
– संगणक प्रिंटरवर 28 टक्क्यांऐवजी आता 18 टक्के
– काजू 18 वरून 12 टक्के
– इन्सुलिन 12 टक्क्यांवरून 5 टक्के
– स्कूलबॅग 28 टक्क्यांवरून 18 टक्के
– शालेय वह्या 18 टक्क्यांवरून 12 टक्के
– सॉस, डबाबंद खाद्यपदार्थ 18 टक्क्यांवरून 12 टक्के
– ट्रॅक्टरचे सुटे भाग 28 टक्क्यांवरून 18 टक्के
– अगरबत्ती 12 टक्क्यांवरून 5 टक्के
– कटलरी 18 टक्क्यांवरून 12 टक्के
– सॅनिटरी नॅपकिनवरील 12 टक्के कर कायम
– टेलिकॉम क्षेत्रावरील 18 टक्के कर कायम
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.