GST लागू झाल्यानंतर किती कर लागणार सोन्याच्या दागिन्यांवर?

GST लागू झाल्यानंतर किती कर लागणार सोन्याच्या दागिन्यांवर?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होईल. सर्वच राज्यांनी सहमती दिल्याने देशात जीएसटी लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पण, त्याआधी सोनं, चप्पल, बिस्किट आणि कपडा या वस्तूंवर जीएसटीची रक्कम निश्चित करण्यात आली.

 

बिडीवरही जीएसटी लावण्यात आला. पण, सिगरेटसंदर्भातला निर्णय 11 जुलैच्या बैठकीत होणार आहे.

 

वस्तू आणि सेवांवरच्या विविध राज्यांचे आणि केंद्रीय कर एकत्र करुन एकसमान करआकारणीचं उद्दीष्ट जीएसटीमधून ठेवण्यात आले.

 

जीएसटीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये 2 टक्के वाढ होईल असा अंदाज आहे.

जीएसटी दर निश्चित

बीडी 28 %

सोनं  3 %

हिरे 3 %

500 रुपयांपर्यंतची चप्पल  5 %

500 रुपयांपेक्षा जास्त रकमेची चप्पल 18 %

बिस्किट 18 %

रेडीमेड कपडे 12 %

धागा आणि तागा 5 %

शेतीसंबंधी सामग्री 5 %

मॅनमेड फायबर 5 %

सिंथेटिक फायबर 18 %

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version