जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जीएसटी लागू करण्याआधी जीएसटी कौन्सिलनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. रासायनिक खतांवर आकारण्यात आलेला 12 टक्के कर रद्द करुन तो आता 5 टक्के करण्यात
आला.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कौन्सिलच्या 18 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रासानियक खतांना 12 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण कौन्सिलच्या देशभरातल्या प्रतिनिधींनी हा कर कमी करावी अशी मागणी केली होती.
त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 12 टक्के स्लॅबमुळे खतांच्या किंमती वाढण्याची भीती होती. पण हा कर कमी करण्यात आल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.