वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आज मध्यरात्री क्रांती घडणार आहे. कारण, आज मध्यरात्रीपासून वस्तू सेवाकर अर्थातच जीएसटीची अंमलबजावणी होणार.
एक देश एक कर अशी ओळख मिरवणारा जीएसटी कर मध्यरात्रीपासून अंमलात येईल. केंद्र सरकारने अगदी दिमाखदार सोहळ्यात जीएसटी लागू करण्याचं ठरवले.
नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीच्य स्वागताचाच जणू सोहळा ठेवण्यात आला. रात्री 11 वाजता या सोहळ्याची सुरुवात होईल.
मुख्य व्यासपिठावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असेल.
लॅपटॉपच्या सहाय्याने जीएसटीचं औपचारिक स्वागत होईल. तसंच जीएसटीवरचे लघुपटही दाखवले जातील. लोकसभा तसंच राज्यसभेतल्या सर्व खासदारांना या
सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले.
पण काँग्रेस, तृणमुल काँग्रे, डावे तसंच इतर विरोधी पक्षांनी मात्र या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचं ठरवले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.