Greg Biffle Plane Crash: क्रीडा क्षेत्रावर शोककळा! विमान अपघातात दिग्गज खेळाडूचा मृत्यू, पत्नी आणि मुलंही आगीच्या विळख्यात

टेकऑफनंतर तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले असून, या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
Greg Biffle Plane Crash: क्रीडा क्षेत्रावर शोककळा!  विमान अपघातात दिग्गज खेळाडूचा मृत्यू, पत्नी आणि मुलंही आगीच्या विळख्यात

अमेरिका: जगाच्या क्रीडा विश्वावर शोककळा पसरवणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये घडली आहे. NASCAR (National Association for Stock Car Auto Racing) दिग्गज ग्रेग बिफल यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रेसिंग जगतासह चाहत्यांमध्येही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सकाळी स्टेट्सविले प्रादेशिक विमानतळाजवळ हा अपघात झाला. फ्लोरिडाकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या एका खाजगी विमानात ग्रेग बिफल, त्यांची पत्नी आणि त्यांची लहान मुले प्रवास करत होती. विमानात एकूण सात जण होते आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत एकाही प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सेस्ना C550 बिझनेस जेट सकाळी सुमारे 10 वाजता स्टेट्सविले विमानतळावरून उड्डाणासाठी निघाले होते. टेकऑफनंतर काही क्षणांतच पायलटला तांत्रिक अडचण जाणवली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच विमान परत विमानतळावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही क्षणांतच नियंत्रण सुटले आणि विमान वेगाने खाली कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाला भीषण आग लागली. काही वेळातच संपूर्ण विमान जळून खाक झाले. नॉर्थ कॅरोलिना स्टेट हायवे पेट्रोलच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी परिसरात पाऊस सुरू होता आणि विमान थेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. संबंधित विमान ज्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होते, ती कंपनी ग्रेग बिफल यांच्याशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा: Satara Drugs Case: ‘शिंदे कुटुंबाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, विरोधकांकडून बदनामीचा कट’; मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंची पाठराखण

 
या विमानात ग्रेग बिफल यांच्यासोबत त्यांची पत्नी क्रिस्टीना, पाच वर्षांचा मुलगा रायडर आणि चौदा वर्षांची मुलगी एम्मा प्रवास करत होते. त्यांच्यासोबत इतर जवळचे लोकही होते. अपघाताच्या वेळी जवळच असलेल्या लेकवुड गोल्फ क्लबमध्ये उपस्थित असलेले लोक हा भयावह प्रसंग पाहून स्तब्ध झाले. गोल्फ कोर्सच्या काही भागांमध्ये विमानाचे अवशेष विखुरलेले दिसून आले.

ग्रेग बिफल हे NASCAR विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय नाव होते. त्यांच्या निधनाने केवळ एक महान रेसरच नाही, तर एक कुटुंबवत्सल पती आणि प्रेमळ वडीलही जगातून निघून गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
हा अपघात अमेरिकेच्या क्रीडा इतिहासातील एक काळा अध्याय ठरला आहे. संपूर्ण रेसिंग जगत आज या अनपेक्षित दुःखात सहभागी झाले आहे.

हेही वाचा: India School: देशात 5149 सरकारी शाळा विद्यार्थ्यांविना; शिक्षणव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version