दुष्काळ नव्हे, दुष्काळसदृश!

दुष्काळ नव्हे, दुष्काळसदृश!

महाराष्ट्र राज्यातल्या 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ नव्हे, तर दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यमंत्री मंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली.

 

या 180 तालुक्यांमध्ये 8 उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या 8 उपाययोजनांमध्ये वीज, टॅंकर, शिक्षण, चारा छावण्या इत्यादींचा समावेश आहे. या सर्व दुष्काळसदृश तालुक्यांची पाहणी केंद्र सरकारचं पथक करणार आहे. यानंतर त्यांचा अहवाल सादर करतील. त्यानंतर मदतीची घोषणा होईल.

 

मात्र विरोधी पक्षांकडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी दबाव वाढत आहे. सत्तेतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने दुष्काळ जाहिर करावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा केला होता. तसंच या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘दुष्काळावर तातडीने उपाय केले पाहीजेत. छावण्यांची उभारणी केली पाहीजे. काहीही करा पण जनावारांना जगवा’  असं म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version