कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींची  माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्यास राज्य सरकारने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

 

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली.  कॉम्रेड पानसरे यांच्यावर फेब्रुवारी 2015 मध्ये हल्ला झाला होता.

 

या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोळकर यांच्यावर विशेष तपास यंत्रणेने दोषारोप दाखल

केले.

 

यापैकी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत आहेत तर समीर गायकवडला नुकताच जामीन मंजूर झाला. विनय पवार आणि सारंग अकोळकर यांच्याबाबत कोल्हापूर सत्र

न्यायालयाने गेल्या महिन्यात अटक वारंट जारी करूनही ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version