राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोनामुक्त

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोनामुक्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कोरोनासंबंधित उपचार करण्यात आले. राज्यपाल कोरोनाबाधित असल्यामुळे राजकीय हालचालींवर मर्यादा येत होत्या. परंतु आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. त्यानंतर ते थेट राजभवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांना आज डिस्चार्ज मिळाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येईल.

संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेनाविरुद्ध शिंदे गट समर्थक असा संघर्ष सुरु झाला आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना बंडखोरांविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान  ‘शिवसेने भाजपसोबत युती करावी.यातच आपले हित आहे, ‘असे वक्तव्य शिंदे समर्थक दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच शिंदेंच्या समर्थनार्थ शनिवारी ठाण्यात श्रीकांत शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. सर्व घटनांमुळे महारातष्ट्रात सत्ताबदलाचे चिन्ह दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version