नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने तांदूळ खरेदीचे लक्ष्य वाढवले आहे. सरकारने चालू खरीप हंगामात ५२१.२७ लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात केंद्र सरकारने ४९६ लाख टन तांदूळ खरेदी केला होता. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात भात पीक घेतले जाते. यामुळे वर्षभरात तांदूळ खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण होईल, असा विश्वास सरकारी अधिकारी व्यक्त करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.