कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे; सरकारचा ऑनलाईन सातबारा घोळ

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे; सरकारचा ऑनलाईन सातबारा घोळ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माढा येथील शालनबाई गजेंद्र घोलप व आनंद विश्वनाथ मासाळ या दोन शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर चक्क दुसऱ्याच्या उताऱ्यावरील तब्बल 13 कोटी 50 लाखांचा बोजा चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, जिल्हा निबंधक कार्यालयाच्या या घोडचुकीचा मानसिक त्रास या दोन्ही शेतकरी कुटूंबियांना सहन करावा लागतोय.

सात बारा उताऱ्यावर अचानक 13 कोटी 50 लाख रुपयांचा बोजा कसा काय चढवला गेला. याप्रश्नानं हे शेतकरी कुटुंब बुचकळ्यात पडलंय. आता शालनबाई घोलप या शेतकरी महिलेने कायदेशीर लढा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या दोन्ही चुका तांत्रिक अडचणी आणि अनावदानानं झाल्याची कबुली माढा महसूल प्रशासन तसेच सहायक दुय्यम निबंधक यांनी दिलीय. या प्रकारामुळे सरकारच्या ऑनलाईन सात बारा उताऱ्यावर विश्वासार्हता ठेवायची तरी कसा असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version