‘राज्यात सरकार अस्तित्वात नाही’ – देवेंद्र फडणवीस

‘राज्यात सरकार अस्तित्वात नाही’ – देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज गोंदियात दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सरकार कुठे आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणसवीस यांनी उपस्थित केला  आहे.

गोंदियामध्ये जिप आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस गोंदियात दाखल झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांनी तोफ धडाडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारव टोला लगावला. राज्यात सरकारच अस्तित्वात नाही, असी टीका फडणवीसांनी राज्यातील ठाकरे सरकारवर केली आहे. तसेच राज्यात सरकार हरवले असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे. लोकांसाठी काम करणारी सरकार महाराष्ट्र राज्यातून हरवली आहे, त्यामुळे जे कोणी या सरकारला शोधणार, त्यांना बक्षिस देण्यात येईल, असे म्हणण्याची आज आवश्यकता झाली आहे. राज्यात मंत्री असो, राज्यमंत्री असो सत्तापक्षाचे विधायक असो हे सर्व केवळ वसुली करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारतर्फे नागरिकांना लुटण्याचे काम सुरू आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, ओबीसी आरक्षण स्थगिती यावर मविआ सरकार दुर्लक्ष करत असून केवळ स्वत:ची चिंता आहे. तसेच कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राज्य सरकार हरवले असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियामध्ये केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version