राज्यातील सरकारी डॉक्टर्स, परिचारिका संपावर

राज्यातील सरकारी डॉक्टर्स, परिचारिका संपावर

परिचारिका, नर्सेस, वॉर्ड बॉयसह इतर आस्थापनातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजीही सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णांकडे पाहण्यासाठी कोणीही नसल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, फोर्थ क्लासेस डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात आज संपावर गेलेले आहेत. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही, असा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. नर्सेस आणि परिचारिकाही या संपात सहभागी झाल्याने सायन हॉस्पिटलमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. परिणामी रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. मुंबईतील सायनसह अनेक रुग्णालयात हेच चित्र दिसत आहे. तर पुण्यातील ससून रुग्णालयातील नर्सेसही संपात सहभागी झाल्या आहेत. ससून रुग्णालय परिसरात परिचारिकांनी आंदोलन सुरू केलं आहे.

नागपूर शासकीय रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालयातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. मेडीकल कॉलेजमधील 1100 परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे नागपूर मेडीकलमधील रुग्णसेवेवर संपाचा परिणाम झाला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील घाटी रुग्णालयातील ८०० नर्स संपावर गेल्या आहेत. या सर्व नर्स रुग्णालयातील ओपन स्पेसवर जमल्या आहेत. राज्य सरकार विरोधात नर्सेसची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ८०० नर्सेस संपावर गेल्यामुळे घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेला जबरदस्त फटका बसला आहे. नर्सेस संपावर गेल्याने संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version