राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात, मराठीत भाषण न झाल्याने विरोधकांची घोषणाबाजी

राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात, मराठीत भाषण न झाल्याने विरोधकांची घोषणाबाजी

वृत्तसंस्था, मुंबई

सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शेतकरी कर्जमाफी आणि सरकारच्या विविध योजनांबद्दल आपल्या अभिभाषणात माहिती दिली. मात्र, हे भाषण इंग्रजी होते. आणि त्याचा अनुवादही मराठीत नव्हता, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी सभात्याग भवनाच्या बाहेरही काही काळ घोषणाबाजी केली. एकूणच अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक सरकारला चांगलंच घेरणार असल्याची चिन्ह दिसतायंत.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त बैठक घेऊन कर्जमाफी, गारपिटीचे नुकसान यांसह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर फडणवीस सरकारला अधिवेशनात जाब विचारण्याचा निर्णय घेतला. तर, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या वतीनेही विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version