गोरखपूरमधील बालमृत्यू प्रकरणी आरोपी अटकेत

गोरखपूरमधील बालमृत्यू प्रकरणी आरोपी अटकेत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

 

गोरखपूर मध्ये झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉ. काफिला खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी ऑक्सिजन थांबवण्यात आल्याने 35 पेक्षा अधिक मुलांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

बालमृत्यू प्रकरणी त्यांना चौकशी समीतीने जबाबदार धरत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या धक्कादायक घटनेनंतर डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल एज्युकेशन के के गुप्ता यांनी 23 ऑगस्ट रोजी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.

 

मुलांसाठी वेळेत ऑक्सीजन मिळवून देण्यात हलगर्जी पणाचा केल्याचा ठपका  डॉ. खान त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप होता.

 

या कृत्याला साथ दिल्याचा प्राचार्य मिश्रा यांच्यावर आरोप करण्यात आला होता. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाकडे लाखो रुपयांचे बील थकल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या 70 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 35 पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेसाठी रुग्णालयाचे प्रमुख राजीव मिश्रा आणि मेंदूज्वर विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. डॉ. काफील खान यांना विभागप्रमुख पदावरून हटवण्यात आल्यानंतर ते गायब झाले होते. अखेर काल त्यांना अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version