मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल तयार केले आहे. अभिनेते एलन रिकमन यांचे हे डूडल आहे. त्यांनी हॅरी पॉटर आणि डाय हार्ड सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गूगलने हे डूडल तयार केले आहे.
एलन यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1946 रोजी वेस्ट लंडनमध्ये झाला. आपल्या विद्यार्थी जीवनात एलन रिकमन यांनी माध्यमिक शिक्षणानंतर चेल्सी कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन आणि रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये ग्राफिक डिझाइनचे शिक्षण घेतले.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलन यांनी वयाच्या 26 व्या वर्षी एका कंपनीत काम केले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
एलन रिकमन यांनी हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन, हॅरी पॉटर आणि चेंबर अँड सिक्रेट्स,हॅरी पॉटर अँड प्रिजनर ऑफ अझकाबान, हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर या हॅरी पॉटर चित्रपटाच्या सीरिजमध्ये प्रोफेसर सेव्हरस स्नेप ही भूमिका साकारली. या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी नाझी काही चित्रपटनमध्ये काम केले आहे. त्यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी त्यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.