जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गुगलने प्रतिभावान कवयित्री आणि गद्य लेखिका महादेवी वर्मा यांना डूडलद्वारे स्मरण केलंय. वर्मा या हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते.
आधुनिक हिंदीच्या समर्थ कवी असल्यामुळे त्यांना ‘आधुनिक मीरा’ पण म्हंटले जाते. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते. गुगलने त्यांचं डूडल साकारुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.