वृत्तसंस्था, मुंबई
समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या 115व्या जयंतीनिमित्त गुगलनं डुडलद्वारे त्यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिलीय. चट्टोपाध्याय यांनी केलेल्या कार्याची झलकही डूडलमध्ये पाहायला मिळत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कमलादेवी यांनी रंगभूमी व हातमागावरील उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिलं होतं. समाजातील शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची कामगिरी कमलादेवींनी बजावलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.