जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
प्रख्यात दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा आज 93वा वाढदिवस आहे.
यानिमित्ताने गुगलने खास डुडल साकारलंय. मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 ला पंजाबच्या कोटला सुल्तान सिंह या गावी झाला.
आवाजाच्या या बादशहाला संगीताची प्रेरणा एका फकिराकडून मिळाली. त्यानंतर त्यांच्या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं.
रफींच्या या गायनाची दखल घेत गुगलने या महान गायकाचं डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.