‘भारत बंद’ला दुपारच्या सत्रात चांगला प्रतिसाद…

‘भारत बंद’ला दुपारच्या सत्रात चांगला प्रतिसाद…

भारत बंदला नाशिकमध्ये सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर दुपारच्या सत्रात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळच्या सुमारास काही दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली तर काहींनी सुरू ठेवली आहेत.

या बंदमध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान काही मनसे कार्यकर्त्यांनी पंचवटी येथील बस डेपो समोर आंदोलन करत बस रोखण्याचा प्रयत्न केला. 

नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

या आंदोलना निमित्त नाशिकमध्ये मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पार्टी या सर्व पक्षाची आज एकजूट पाहायला मिळाली.

बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधील सर्व बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करत होते.

काही ठिकाणी रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. तसेच शहरात काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले.

नाशिकच्या द्वारका भागात काही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पोस्टर जाळण्याचा देखील प्रयत्न केला गेला.

मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हे पोस्टर हिसकावून घेतले.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून आज नाशिक मधील बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत थांबावे लागले. नाशिकमधील अंतर्गत बससेवा आणि बाहेरील बससेवा या दोनहीसेवा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

एकूणच सकाळच्या सत्रात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दुपारनंतर मात्र या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.

संबंधित बातम्या

#BharathBandh काँग्रेससह ‘मनसे’चाही बंदला पाठिंबा, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

महागाई विरोधात सोमवारी भारत बंद!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version