शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्मा करण्याची घोषणा

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्मा करण्याची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी व्हावा यासाठी NCERT नं एक महक्व पूर्णक निर्णय घेतला आहे. पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम आहे त्याहून निम्मा करण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

सध्याचे शालेय अभ्यासक्रम हा कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षाही जास्त असल्याच त्यांनी सांगितल. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

यावेळी प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवरही शंका ही उपस्थित केली. या विशयावर बोलक असताना, “विद्यार्थ्यांच्या चांगल्या बाजू आणि कमकूवत बाजू शिक्षकांनी समजून घ्याव्यात यावरही त्यांनी भाष्य केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील तयारीस मदत करायला हवी.” असंही ते यावेळी म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version