हार्बर रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी

हार्बर रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नेहमीच चिंतेत असणाऱ्या हार्बर मार्गावरील प्रवाशांनी आता मोकळा श्वास घेण्याची वेळ आली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण 26 लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापैकी 10 फे-या हार्बर मार्गावर आणि 16 फे-या ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

31 जानेवारीपासून या लोकल फे-या सुरु होणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान धावणाऱ्या हार्बर मार्गावरुन सुमारे दहा लाख प्रवासी रोज प्रवास करतात. तर ठाणे आणि नवी मुंबई स्थानकांना जोडणा-या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून लोकल फे-या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती.

26 वाढीव फे-यांमुळे हार्बर वरील लोकल फे-यांची संख्या 604 वरुन 614 झाली आहे. तर ट्रान्स हार्बरवरील लोकल फे-यांची संख्या 246 वरुन 262 झाली आहे. वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version