Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; दुबईहून आलेल्या विमानाच्या शौचालयातून 4 कोटींचे सोने जप्त

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; दुबईहून आलेल्या विमानाच्या शौचालयातून 4 कोटींचे सोने जप्त

गुजरात : गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर एका विमानातील प्रसाधनगृहातील (lavatory) स्पीकर बॉक्समध्ये लपवून ठेवलेले 4.26 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने सीमाशुल्क (कस्टम्स) अधिकाऱ्यांनी जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळावर करण्यात आली. हे सोने दुबईहून आलेल्या इंडिगोच्या 6E-1478 या विमानात सापडले. एका संशयावरून, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी विमान अभियंत्यांच्या मदतीने विमानाची सखोल तपासणी केली. या तपासणीदरम्यान, त्यांना विमानातील समोरील बाजूच्या प्रसाधनगृहात असलेल्या स्पीकर बॉक्समध्ये काळ्या प्लास्टिक टेपने गुंडाळलेल्या दोन पिशव्या (पाउचेस) आढळून आल्या. अधिकाऱ्यांनी भिंतीवर बसवलेला तो स्पीकर बॉक्स उघडला ज्याचा वापर सहसा विमानात सूचना देण्यासाठी केला जातो. तसेच त्यांना त्यातील ऑडिओ उपकरणांच्या मागे अडकवून ठेवलेल्या त्या पिशव्या सापडल्या.

हेही वाचा : Nanded Aanchal Mamidwar : ‘मी तोंड उघडलं तर बदनामी होईल’; घर सोडण्याच्या आरोपावर अखेर आंचलने मौन सोडलं, सक्षमच्या घरच्यांबाबत केला धक्कादायक खुलासा

स्पीकरच्या आत अधिकाऱ्यांना परदेशी बनावटीचे 24 शुद्ध सोन्याची बिस्किटं सापडली. ही बिस्किटं 999.0 शुद्धतेची (24 कॅरेट) होती. तसेच त्यांचे एकूण वजन 2.799.3 ग्रॅम, म्हणजेच सुमारे 2.8 किलोग्रॅम इतके होते. “तपासणीदरम्यान, त्या पिशव्यांमध्ये 999.0 शुद्धतेची (24 कॅरेट) 24 सोन्याची बिस्किटे आढळली. ज्यांचे एकूण वजन 2,799.3 ग्रॅम होते. देशांतर्गत बाजारपेठेत या सोन्याचे मूल्य 4,26,89,325 रुपये इतके आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त ‘आयएएनएस’ (IANS) या वृत्तसंस्थेने दिले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, तस्करी करणाऱ्या व्यक्तीचा उद्देश हे सोने शौचालयाच्या रचनेत लपवून ठेवण्याचा असावा, जेणेकरून नंतर एखादा देशांतर्गत प्रवासी किंवा ग्राउंड क्रूचा सदस्य ते काढून घेऊ शकेल. मात्र, ही योजना यशस्वी झाली नाही. कसून तपासणी होत असल्याचा संशय आल्याने, संबंधित व्यक्तीने कदाचित तो साठा तिथेच सोडून दिला असावा; कारण हे सोने ताब्यात घेण्यासाठी कोणताही प्रवासी पुढे आला नाही. जप्त केलेले सोने बेवारस म्हणून घोषित करण्यात आले असून, ‘सीमा शुल्क कायदा, 1962’ (Customs Act, 1962) अन्वये ते जप्त करण्यात आले आहे. आता अहमदाबाद सीमा शुल्क विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version