Gold – Silver Rate Today: सोन्याच्या किमतींनी पुन्हा झेप घेतली, चांदीही तेजीत; पाहा आजचे नवे दर!

तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल पाहता, वर्षअखेरीस सोने आणि चांदी पुन्हा रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचू शकतात.
Gold – Silver Rate Today: सोन्याच्या किमतींनी पुन्हा झेप घेतली, चांदीही तेजीत; पाहा आजचे नवे दर!

मुंबई : दिवाळीनंतर सतत कमी होत असलेल्या सोने – चांदीच्या दरात आता पुन्हा हालचाल दिसत आहे. काही दिवसांपासून सोने स्वस्त होत चालल्याने सर्वसाधारण ग्राहकांना ते खरेदी करता येत होते. आज मात्र सराफ बाजारात वेगळं चित्र आहे. सोन्याच्या किमती पुन्हा स्थिरावल्या आहेत, तर चांदीच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. आजच्या वायदे बाजारात सोन्याच्या डिसेंबर वायद्याची किंमत 75 रुपयांनी वाढून 1,20,161 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 1,11,750 रुपये, आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,21,910 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

सध्या देशातील सर्वात जास्त सोन्याचा दर जयपूरमध्ये नोंदवला गेला 22 कॅरेट सोने 1,11,490 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोने 1,21,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. उर्वरित शहरात मुंबई प्रमाणेच दर आहेत. दिवाळीनंतर काही दिवस सोन्याच्या किमती घसरत असताना आता लग्नसराईच्या हंगामाने या दरांना पुन्हा उभारी दिली आहे. सोने खरेदीसाठी वाढत्या मागणीमुळे दागिन्यांच्या किमतींमध्ये थोडी वाढ दिसून येत आहे. चांदीच्या बाजारातही हालचाल वाढली असून, आज प्रति किलो चांदीचा दर 1,51,100 रुपये इतका नोंदवला गेला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut Health Update : हात लिहिता राहिला पाहिजे… थेट रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट

दिवाळीनंतर घट झालेल्या चांदीच्या दराने आज पुन्हा 1,000 रुपयांनी वाढ दर्शवली आहे. दिवाळीपूर्वी चांदीच्या दराने रोज नवे उच्चांक गाठले होते, पण सणांच्या दिवसांत जोरदार घसरण दिसली. याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता. 

आता मात्र चांदी पुन्हा चमकू लागल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, वर्षअखेरीस सोने – चांदीच्या दरात पुन्हा वाढीची शक्यता आहे, कारण जागतिक बाजारात मौल्यवान धातूंमध्ये मागणी वाढू लागली आहे. लग्नाचा हंगाम आणि वर्षअखेरीचा काळ लक्षात घेता, सोनं-चांदी पुन्हा रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा अखेर समोर आलाच! 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने थाटात केलं केळवण

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version