जळगाव : सोने दरात मंगळवारी पुन्हा ६०० रुपयांची वाढ होत ते ७५,६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. या भाववाढीमुळे सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे. एक तोळे सोन्यासाठी 'जीएसटी' सह आता ७७,८६८ रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीतही ३०० रुपयांची वाढ होऊन ती ८९,८०० रु. प्रतिकिलो झाली आहे. मे महिन्यात सोने ७५,१०० रुपये अशा उच्चांकी भावावर पोहोचले होते. नंतर भाव कमी झाले. सीमा शुल्क कपातीमुळे भाव पुन्हा कमी झाले; मात्र नंतर गेल्या आठवड्यापासून सोने भाव वाढू लागले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी २१ सप्टेंबर रोजी ते ७५ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.