भारताच्या हीना सिद्धूला सुवर्णपदक

भारताच्या हीना सिद्धूला सुवर्णपदक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर पडली. भारताच्या हीना सिद्धूने ही भर टाकली आहे. हीना सिद्धूने मंगळवारी झालेल्या महिला नेमबाजीच्या 25 मीटर प्रकारात सुवर्णपदकावर लक्ष्यवेध केला. या सुवर्णपदकासोबत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

आज झालेल्या नेमबाजीतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात हीना सिद्ध आणि अन्नू सिंह भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र अन्नू सिंहचे आव्हान फार काळ टिकले नाही. हीना सिद्धू सुद्धा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. पण शेवटच्या फेऱ्यांमध्ये हीनाने आपली कामगिरी उंचावली. अखेरी आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाच्या नेमबाजांना मागे टाकत सुवर्णपदकावर कब्जा केला. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला रौप्य तर मलेशियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version