‘गोकुळ’ दुधाच्या दरवाढीचे संकेत

‘गोकुळ’ दुधाच्या दरवाढीचे संकेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी आता गोकुळ दुधाच्या दरवाढीचे संकेत मिळाले आहेत. या दरवाढीनं दूध ग्राहकांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

सरकारनं 21 जून रोजी दूध खरेदी दरात वाढ केल्यानं ‘गोकुळ’वर प्रतिमहिना सुमारे अडीच कोटी रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. हा भुर्दंड सहन करण्याची ऐपत नसल्यानं दरवाढीचा निर्णय घेतल्याचं गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलं.

 

सरकारनं वाढ केलेल्या दूध खरेदी दरापेक्षा ‘गोकुळ’चा खरेदी दर जास्त असल्याचंही अध्यक्षांनी नमुद केलं. तर दूध विक्रीचा दर किती आणि कधी वाढवायचा हे महिनाभरात निश्चित होईल, असंही ते म्हणाले. मात्र, आता ग्राहकांना याचा फटका बसणार हे निश्चित.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version