गोकुळ दूध दरावरून राजकारण पेटलं

गोकुळ दूध दरावरून राजकारण पेटलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गोकुळ दुधाच्या दरावरून राजकारण पेटू लागलंय. आमदार सतेज पाटील यांच्या मोर्चानंतर आता खासदार धनंजय महाडिक रस्त्यावर उतरणार आहेत.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निषेध मोर्चा निघणार आहे. गोकुळनं गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फटका उत्पादकांना बसणार असल्यानं दरकपात मागे घ्यावी, या मागणीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात दूध उत्पादकांनी मोर्चा काढला होता.

त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा आरोप खोडून काढलाय. आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात दूध उत्पादकांचा मोर्चा निघणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version