मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसचा मोठा अनर्थ टळला

मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसचा मोठा अनर्थ टळला

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे अहमदनगरमध्ये मोठा अनर्थ टळलाय. श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्यानंतर मोटरमनने वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात टळला आहे.

त्यानंतर या मार्गावर रेल्वेचा खोळंबा झाला. श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळाला घासले आणि त्यामुळे रेल्वे रुळाला मोठा तडा गेला.

मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अपघात टळला. दरम्यान, कायदा सुव्यवस्था आणि लूटमार रोखण्यासाठी रेल्वेने सशस्त्र पोलिस तैनात केले होते.

रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version