पुढील उपचारांसाठी मनोहर पर्रिकरांची रवानगी अमेरिकेत होण्याची शक्यता

पुढील उपचारांसाठी मनोहर पर्रिकरांची रवानगी अमेरिकेत होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना 15 फेब्रुवारीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागले होत. या त्रासामुळे त्यांच्यावर पहिल्यांदा गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले होते. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं.

लीलावती रुग्णालयातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रिकर पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. गोमेकॉ रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पर्रिरकरांनी घरातूनच कामाला सुरुवात केली. त्यांनी महत्त्वाच्या फाईल्स घरातून क्लिअर केल्या.

आज पर्रिकर मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय कामे हातावेगळी करणार असून, भाजपच्या आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. आपल्या गैरहजेरीत कोणतीही कामे अडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला 50 लाखांप्रयत्न निधी खर्च करण्याची परवानगी दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version