गोव्यातील खवळलेल्या समुद्रात अडकले कसिनो शिप; सुटकेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

गोव्यातील खवळलेल्या समुद्रात अडकले कसिनो शिप; सुटकेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

वृत्तसंस्था, पणजी

 

गोव्यातील खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या कसिनो शिपच्या सुटकेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  

गोव्यातील समुद्रात अडकलेल्या एम व्ही लकी सेव्हन या जहाजावरुन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चौघांना वाचवण्यात आले.

 

पणजीजवळ मीरामार बीचवर एम व्ही लकी सेव्हन हे जहाज समुद्रात अडकलं होते. त्यावरील चार कर्मचाऱ्यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यापैकी एकाचा हात मोडला होता,

तर तिघांना उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला.

 

पणजीहून निघालेल्या कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टनं या चौघांची सुखरुप सुटका केली. सुटका झालेल्यांना मीरामारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version