धावत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग

धावत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग

मुंबई, १५ जून,२०२३, प्रतिनिधी :

सावित्रीबाई वसतीगृहातील घटना ताजी असतानाच आत्ता मुंबई मध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्येच मुली सुरक्षित नाहीत. धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घडना १४ जून रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्या वर हा प्रसंग ओढावला. नवाज करीम (४० वर्ष) अस या आरोपीच नाव असून आरोपी हा रोजंदारी करून स्व:तच पोट भरतो. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणी ही मुंबई मधील गिरगाव येथील रहिवासी आहे. तरुणी बेलापूर येथे परीक्षेला जात असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी ७:२८ च्या सुमारास तरुणी लोकलच्या सेकंड क्लास डब्यामधून प्रवास करत होती. ट्रेन सुरू होताच आरोपी नवाज करीम महिला डब्यात चढला. तरुणी डब्यात एकटी आहे याचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणी वर लैंगिक अत्याचार केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुणीने आरडाओरडा करायला सुरवात केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्टेशन वर उतरून तेथून पळ काढला.

घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करून त्याच्या वर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला . आरपीएफ,क्राईम ब्रान्च,जीआरपी ,मुंबई पोलीसांची पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. मस्जिद स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला घटनेच्या आठ तासानंतर अटक करण्यात आली असून पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीला गुरवारी न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. या घटणेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version