कॉपी करताना पकडल्याने, विद्यार्थिनीची आत्महत्या

कॉपी करताना पकडल्याने,  विद्यार्थिनीची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कॉपी करताना पकडल्या गेलेल्या 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पवई परीसरात समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंदवला आहे. 
12 वर्षीय रिद्धी कुर्ल्याच्या सेंट मायकेल  शाळेत 8 वी इयत्तेत शिकत होती. शाळेत पेपर दरम्यान तिच्या ऊत्तरपत्रिकेखाली ठेवलेली कॉपी शिक्षिकेने पकडली त्यानंतर मुलीच्या पालकांना कळविण्यात आलं आणि मुलीला घरी पाठवून देण्यात आलं. 
रिद्धीची आई शिकवण्या घेत असे. घरी गेल्यावर रिद्धी आपल्या खोलीत गेली आणि आई क्लास घेऊ लागली बराच वेळ रिद्धी बाहेर न आल्याने आईने आत जाऊन बघितले तेव्हा रिद्धी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस परीक्षा केंद्रातील ‌शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहेत. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version