वृत्तसंस्था, आग्रा
उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या अँटी रोमियो पथकाची दहशत संपली की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण आग्र्यात एकतर्फी प्रेमातून युवतीवर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शाहगंज कॉलनीत राहणाऱ्या या तरुणीच्या घराबाहेर हा तरुण आला. आणि तिच्या खोलीबाहेर गोळ्या झाडून फरार झाला. सुदैवानं तरुणी बचावली. मात्र, योगी सरकारच्या अँटी रोमिओ पथक फेल ठरलंय की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.