नोकरीचे आमिष दाखवत तरुणीसोबत गैरवर्तन

नोकरीचे आमिष दाखवत तरुणीसोबत गैरवर्तन

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

आजवर आपण सोशल मिडियावरुन फसवणुकीच्या गोष्टी ऐकल्यात. पण आता तर, सोशल मिडियावरुन फसवणूक करत लैंगिक अत्याचार झाल्याचेही समोर येत आहे.  नोकरीचे अमिष दाखवून तरुणीची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नगर परिसरात घडली आहे.

सोशल मीडियाच्या माध्य़मातून तरुणीशी ओळख करत तिची फसवणुक करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  दंतचिकीत्सक म्हणून खासगी रुग्णालयात काम करणा-या तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार व मारहाण केलीय याप्रकरणी आरोपी विजय मकासरे विरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version