मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या

मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या

चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या झाली आहे. अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय. सावित्रीबाई फुले महिला वस्तीगृतील धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर विवस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळलाय. तर हॉस्टेलचा सुरक्षारक्षक गायब झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, संशयित आरोपी सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची समोर आलं आहे. घटनेनंतर संशयित आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आरोपीने चर्नी रोड दरम्यान रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह दुपारीच शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला.

आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया असे असून तो तब्बल १८ वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला आरोपीने पीडित तरुणीचा बलात्कार करून हत्या केल्याचं समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मृत आरोपी ओमप्रकाश कनोजियावर भादवी कलम ३०२ आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया असे असून तो तब्बल १८ वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version