गावगुंडांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

गावगुंडांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

जय महाराष्ट्र वेब न्यूज, औरंगाबाद

 

गावगुंडांच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडलीये.


औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालूक्यातील तांदूळवाडी १९ वर्षीय तरुणीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
प्रियंका बजरंग मोरे असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे.

 

11 वीमध्ये शिकत असणा-या प्रियंकाला कॉलेजला जाताना गावातले टवाळखोर मुलं त्रास देत होते. यासंदर्भात तिने पालकांकडे तक्रार केली होती. तसंच पोलिसांकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 2 महिने या गावगुंडांचा त्रास कमी झाला होता.

 

मात्र पेरणीचा हंगाम सुरू झाल्यावर जेव्हा मुलीचे पालक पेरणीच्या कामासाठी शेतावर जात, तेव्हा ही मुलं थेट घरात घुसून प्रियंकाची छेडछाड करू लागले. या प्रकाराने खचून गेलेल्या प्रियंकाने चार दिवसांपूर्वीही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी उपचार करून तिला वाचवलं. मात्र एवढं होऊनही पोलिसांनी त्या गावगुंडांविरोधात कडक पाऊल उचललं नाही. अखेर प्रियंका गळफास लावून आत्महत्या केली.

 

विशेष म्हणजे, एवढं घडूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. या गावगुंडांविरोधात तक्रार करूनही पोलीस अजूहमी कारवाई करायला तयार नाहीत. मुलीचा जीव जाऊन 24 तास उलटून गेल्यावरही तिचे गुन्हेगार मात्र मोकाटच आहेत. ही टवाळखोर पोरं गावातील बड्या घरची मुलं असल्यामुळे पोलीस कारवाईला टाळाटाळ करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

अगदी अशाच स्वरूपाची आणखी एक घटना बारामतीलाही घडली आहे. कॉलेजला जात असताना दररोज होणाऱ्या छेडछाडीला वैतागुन आकांक्षा दरेकर या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. महापुरुषांच्या नावाचा उल्लेख करत राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना ही एक मोठी चपराकच आहे अनेक वेळा घरी सांगूनही रोजच त्रास होत असल्याने आकांक्षाने मृत्युला जवळ केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version