विक्री वाढीसाठी दारूला महिलांची नावे द्यावीत – गिरीश महाजन यांचा अजब सल्ला

विक्री वाढीसाठी दारूला महिलांची नावे द्यावीत – गिरीश महाजन यांचा अजब सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

दारूची विक्री वाढविण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्या उत्पादनाची विक्री हमखास होते. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवावे. असा अजब सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर सभेत कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिलाय.

मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर, गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असतांना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ करावे. असं वादग्रस्त विधान करून गिरीश महाजनांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version