जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नारायण राणे मंत्री होणारच असा पुनरुच्चार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे.
राणे मंत्री म्हणून येणार आणि सरकार अस्थिर होणार नाही, असे शुभ संकेतही त्यांनी दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
कुणीही आले किंवा गेले तरी आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचं सरकार स्थिर आणि नेतृत्व खमकं आहे असे गिरीश बापट म्हणाले.
उद्धव ठाकरेंना काही अडचण असली तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात, असे सांगायलाही गिरीश बापट विसरले नाहीत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.