वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नवरात्रौत्सवात शिवसेना आक्रमक झाली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांसविक्रीची अवैध दुकाने बंद पाडली.
नवरात्रौत्सवाच्या काळात शहरातील मांसविक्रीची अवैध दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी याआधीच शिवसेनेने प्रशासनाकडे केली होती.
त्यामुळे आतापर्यंत येथील 50 टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली. पण, प्रशासनाने आदेश देऊनही काही दुकाने सुरू होती. ती शिवसेना कार्यकर्त्यांनी आज बंद केली, अशी माहिती पक्षाचे स्थानिक नेते रितू राज यांनी दिली. मात्र, शिवसेनेच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.