जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेत घुसून तिघांनी सातवी इयत्तेत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना सोमवारी घडली. आरोपीचा चावा घेऊन रिक्षातून पळ काढल्याने पीडित मुलीची नराधमांपासून सुटका झाली. याबाबत तिच्या आईने घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली.
असल्फाजवळ रिक्षा आली असता मुलीने समयसूचकता दाखवत यातील एका इसमाच्या हाताला चावा घेतला आणि पळ काढला. आरडाओरडा करून लोकांना गोळा केले. परंतु रिक्षा चालकासह दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.