जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
असल्फाच्या सिद्धीविनायक नगराला चल रंग दे या सामाजिक संस्थेमुळे एक नवी झळाळी मिळालीय. 170 रंगकागिरांनी आणि 70 चित्रकारांनी हा उपक्रम हाती घेतला होता.
170 चित्रकरांनी तब्बल 400 लीटर रंगाचा वापर करत 200 घरांना नवी प्रसन्नता मिळवून दिलीय. या परिसरात लहान मुलांना आवडणारी कार्टून कॅरेक्टर्सही रेखाटण्यात आलीय.
फक्त देशातूनच नाही तर परदेशातूनही पर्यटक या वस्तीला भेट देतायंत. यामुळे सिद्धीविनायक नगरचं रुपडं पालटून गेलंय. चल रंग दे या संस्थेचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. इथल्या नागरिकांनी तर आपल्याकडे दिवाळीच आली असल्याची भावना व्यक्त केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.