घाटकोपरमध्ये चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

घाटकोपरमध्ये चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

व्यक्त करण्यात आली.

 

घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ दामोदर पार्क येथील साई अपार्टमेंटमधली साईदर्शन इमारत कोसळली. दहा जणांना ढिगाऱ्याखालून

सुखरुप बाहेर काढलं असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

सुमारे 40 वर्षांपूर्वीची ही इमारत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या निवासी इमारतीत अनेक कुंटूंब वास्तव्यास होती.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने घटनास्थळी तात्काळ मदत यंत्रणा पाठवली.

 

याशिवाय 8 अॅम्ब्युलन्स घटनस्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 8 ते 10 नागरिक अडकल्याची माहिती प्राथमिक माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मात्र 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली

अडकल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे.

 

#LIVE UPDATE

 

– इमारत दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

– मुंबई महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषीत केली होती

– दहा जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version