Gautam Gambhir IND vs SA : गौतमच्या रणनीतीवर टीकेचा गंभीर भडिमार! पावर हिटर 8व्या क्रमांकावर तर टेल-एंडर तिसऱ्या क्रमांकावर

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 51 धावांनी विजय मिळवला.या पराभवामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांवर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर समोर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Gautam Gambhir  IND vs SA : गौतमच्या रणनीतीवर टीकेचा गंभीर भडिमार! पावर हिटर 8व्या क्रमांकावर तर टेल-एंडर तिसऱ्या क्रमांकावर

सध्या मुल्लानपूर येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 51 धावांनी भारतावर विजय मिळवला. क्विंटन डी कॉकने 46 चेंडूत 90 धावा केल्या, ज्यात सात षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर ऑलआऊट केलं. परिणामी, दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आणि पहिल्या पराभवाची अचूक परतफेड केली. या पराभवामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांवर आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर समोर सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा- FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने रचला जागतिक पातळीवरील इतिहास; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

दरम्यान गंभीरने नुकतेच एक विधान केले हेते ज्यात त्याने म्हटले होते की, सलामीवीर वगळता प्रत्येक फलंदाजाने कुठेही खेळण्यासाठी तयार असले पाहिजे. या सामन्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली, ज्यामुळे शेवटी टीम इंडियाचा पराभव झाला. जर टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमवारांचा परिणाम थेट विजयावर झाल्याचा पाहायलाल मिळाला. टीम इंडियातील दोन स्टार फलंदाजांनी त्यांचा फॉर्म वाईटरित्या अपयशी ठरवला. या वर्षी, टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार यांनी एकही अर्धशतक झळकावलेले नाही.

हेही वाचा- Suryakumar Yadav On IND vs SA : कर्णधार सूर्यकुमारने सांगितली टीम इंडियाच्या पराभवाची कारणे; गिलबाबत दिले मोठे विधान! "आपण नेहमीच…"

मालिकेच्या पहिल्या सामन्यात, शुभमन गिलने अवघ्या 4 धावा काढल्या तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने केवळ 12 धावा काढल्या. तरी देखील शुभमन गिलला पुन्हा एकदा सलामीची संधी देण्यात आली ज्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर सूर्यकुमार यादवने फक्त 5 धावा केल्या. दरम्यान, मागील सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा तिलक वर्मा यावेळी पाचव्या क्रमांकावर ढकलण्यात आला. त्याने 62 धावांची लढाऊ खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिलक आला असता तर दबाव इतका तीव्र नसता.

हेही वाचा- BCCI Central Contract: शुभमन गिलचे होणार प्रमोशन, तर कोहली–रोहितला बीसीसीआयचा मोठा धक्का! पगारातून कट होणार 2 कोटी

शुभमन गिल बाद झाल्यानंतर संघाला एका इन-फॉर्म फलंदाजाची आवश्यकता होती. त्यावेळेस टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अक्षर पटेल याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, जे की तो गोलंदाज असल्यामुळे सहसा शेवटून फलंदाजीसाठी उतरतो. दरम्यान फलंदाजी क्रमात केलेले हे बदल फक्त एका सामन्यापुरता मर्यादित नसून ते गेल्या काही सामन्यांमध्ये, गिलला सलामीवीर, तिलकला 3-4-5, हार्दिकला 5-6-7 आणि दुबेला 7-8 असे रोटेट करण्यात आले आहे. परिणामी मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना संघ वारंवार अपयशी ठरला आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघे 8 सामने बाकी असताना जर प्रत्येक खेळाडूला त्यांचे सर्वात मजबूत स्थान दिले नाही, तर ही अनिश्चितता संघासाठी खूप महागात पडू शकते.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version