गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याला भाजपाकडून पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीत जिंकण्यासाठी गौतम गंभीरने प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गौतम गंभीरने वार्षिक उत्पन्न 12.40 कोटी असे सांगितले आहे.

काय म्हटलं गौतमने प्रतिज्ञापत्रात ?

गौतमचा 2017-18 साली झालेल्या प्राप्तिकर परताव्यामध्ये वार्षिक उत्पन्न 12.40 कोटी सांगितले आहे.

तसेच गौतम गंभीरची पत्नी नताशा गंभीरनेही वार्षिक उत्पन्न 6.15 लाख सांगितले आहे.

गौतम गंभीरकडे 4 कार आणि 1 दुचाकी आहे.

स्थावर आणि जंगम मालमत्तेनुसार गंभीरच्या नावावर 147 कोटींची संपत्ती आहे.

त्यामुळे गौतम गंभीर हा दिल्लीतला सर्वात श्रीमंत उमेदवार ठरला आहे.

गौतम गंभीरनंतर पश्चिम दिल्ली मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार महाबली मिश्रा दुसरे श्रीमंत उमेदावर आहेत.

काही दिवसांपूर्वी गौतमने भाजपात प्रवेश केला.

त्यानंतर सोमवारी जाहीर केलेल्या यादीत भाजपाने गंभीरला उमेदवारी जाहीर केली.

आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर गंभीरने प्रचारालाही सुरुवात केली आहे.

आता या लढतीत कोण निवडून येणार यावर सगळ्यांचे लक्ष आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version