वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र शनिवारी जारी करण्यात आले. संशयितांनी हत्येपूर्वी घटनास्थळाची रेकी केली आणि यासंदर्भातील एक व्हिडिओदेखील आमच्या हाती लागला आहे, अशी माहिती विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिलीय.
गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर रोजी बंगळुरुतील निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश यांची हत्या झाल्याने देशभरात खळबळ माजली.शनिवारी एसआयटीचे प्रमुख बी के सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी केले.
साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन स्केच आर्टिस्टकडून आम्ही हे रेखाचित्र तयार करुन घेतले असे त्यांनी सांगितलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.