Farhana Bhatt on Bigg Boss 19 winner : "तो त्या लायक नाही" ‘बिग बॉस 19’ च्या विजेत्यावर फरहाना भट्टची तिखट प्रतिक्रिया

'बिग बॉस 19'च्या विजेतेपदावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने आपलं नाव कोरलं आहे. यादरम्यान गौरव खन्नाच्या विजयावर उपविजेती फरहाना भट्टने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Farhana Bhatt on Bigg Boss 19 winner : "तो त्या लायक नाही" ‘बिग बॉस 19’ च्या विजेत्यावर फरहाना भट्टची तिखट प्रतिक्रिया

सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 19'  16 स्पर्धकांसह 24 ऑगस्टपासून जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोमध्ये नंतर शहबाज बदेश आणि मालती चाह या दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे एकूण 18 स्पर्धक झाले. दरम्यान काल 7 डिसेंबर रोजी बिग बॉस सिझन 19 चा ग्रॅंड फिनाले सोहळा पार पडला. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन त्याला 'बिग बॉस 19' चा विजेता बनवण्याची संधी होती. मात्र, मतदानाची प्रक्रिया रविवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बंद झाली.

त्यानुसार ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच जण पोहोचले होते. त्यानंतर 'बिग बॉस 19'च्या विजेतेपदावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने आपलं नाव कोरलं आहे. तर फरहाना भट्ट हा उपविजेता ठरला. मराठमोळा प्रणीत मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यादरम्यान गौरव खन्नाच्या विजयावर उपविजेती फरहाना भट्टने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने पापाराझींशी संवाद साधला.

हेही वाचा- Dharmendra 90th Birth Anniversary : धर्मेंद्र यांचा वाढदिवस आणि खान कुटुंबाच अनोखं कनेक्शन; सांगताना सलमान खानचे डोळे पाणावले

त्यावेळेस ती म्हणाली की, "मी ट्रॉफीवर कधी नजर टाकलीच नाही, तो ट्रॉफी जिंकला मी प्रेक्षकांची मन जिंकली… गौरव खन्नाचा या बिग बॉस 19 च्या सिझनमध्ये काहीच मोलाचा वाटा नव्हता. प्रेक्षकवर्गाने काय बघितलं मला माहित नाही… पण माझ्या नजरेत त्याने नेहमी सुरक्षित खेळ खेळला. त्याने कधीच स्पष्ट भूमिका मांडली नाही. त्याने त्याच्या वागण्याने लोकांना कमी लेखले आहे, ज्याची मी अनेक वेळा घोषणा केली आहे. मी असा विचार नाही केला की, तो हा शो जिंकेल. मला असं कधीच वाटल नाही. मला नाही वाटत ते हा शो जिंकण्याच्या लायक आहे."  

बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनाले सोहळ्यात फरहाना भट्टने लाल रंगाच्या चमकदार गाऊन परिधान केला होता. फरहानाला बिग बॉस 19 मध्ये दर आठवड्याला 1 ते 3 लाख रुपये मिळत होते. बिग बॉस 19 मधून तिची एकूण 4.5 दशलक्ष कमाई झाली.

https://twitter.com/indiaforums/status/1997807574717276457

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version