गणेशोत्सवानिमित्त देशभरात बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी आनंदाचे वातावरण आहे.
श्रींची विज्ञाननिष्ठता स्वतःपासूनच सुरू होते. त्यामुळे त्यांची पूजाही विज्ञानाशी, आरोग्याशी सुसंगत असते.
आता गणपती बाप्पाच्या पूजेतील घटकचं पाहा ना… गूळ-खोबरं, सुकामेवा, दुर्वा, जास्वंद प्रत्येक घटक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आणि औषधी आहेत.
जास्वंद
- गणपतीला आवडणारे फूल म्हणजे जास्वंद.
- जास्वंद थंड प्रवृत्तीचे फूल आहे. या फुलाचे तेल बाजारात उपलब्ध असतं.
- शरीरातील उष्णता घालवण्यासाठी जसा जास्वंदाचा उपयोग होतो तसेच केसांच्या वाढीसाठी जास्वंदाच्या तेलाचा वापर केला जातो.
- जास्वंद वाटून त्याचा लेप केसांना लावला तर केसगळती थांबते.
- त्यामुळे केवळ गणेशोत्सवातच नाही, तर जास्वंदाचा, वापर आपण नियमित जीवनातही करावा.
दुर्वा
- दुर्वा ही गणपतीची सर्वात आवडती वनस्पती आहे, पण थंड प्रवृत्तीच्या दुर्वांचा वापर इतर वेळीही केला तरी फायदा होतो.
- दुर्वांचा रस किंवा त्या नुसत्या खाल्ल्या तरी ऑसिडीटी, पित्त यावर गुणकारी असतात. यामुळे रक्तदोषही दूर होऊ शकतो.
- त्याचबरोबर दुर्वांवरून सकाळी अनवाणी चालले तरी डोळ्यांसाठी ते फायद्याचे ठरते. डोळ्यांवरील ताण त्यामुळे कमी होतो.
सुकामेवा
- सुक्यामेव्यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, खारीक हे सर्व घटक असतात.
- या प्रत्येक पदार्थात परिपूर्ण पोषक द्रव्ये असतात.
- यातून कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे एकाचवेळी शरीराला मिळतात.
- त्यात स्निग्ध पदार्थ भरपूर असल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असणार्यांना तो गुणकारी ठरतो.
- त्यातील लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, झिंक, सेलेनियम ही खनिजे हाडांना फायद्याची ठरतात.
कापूर
- आरतीच्या वेळी कापूर जाळला जातो. त्यातून मिळणारा प्राणवायू घरातील वातावरण शुद्ध करतो.
- घरातील दुर्गंधी घालवून कीटकही घालवतो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर शुद्ध करण्यासाठी कापूर महत्त्वाचा आहे.
- घरातील सदस्यांची मनंही प्रसन्न होतात. एक उत्साही वातावरण तयार होतं.
- कापूर तेलात भिजवून ते तेल सांध्यांना लावले तर सांधेदुखी दूर होते. तसेच हे तेल केसांना लावले तरी केसांची वाढ चांगली होते.
पंचामृत
- बाप्पाच्या पूजेच्या साहित्यात पंचामृत असते. यात दूध, तूप, मध, दही आणि साखर हे 5 पदार्थ असतात. ते आरोग्याला पोषक असतात.
- पंचामृत गणेशोत्सवातचं नव्हे, तर दररोज चमचाभर घेतले तर फायदा होईल.
- ऑसिडीटीवर ते गुणकारी ठरेल. त्यात दूध, तूप असे ऊर्जादायी पदार्थ असल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते.
- मध, साखर हेही ऊर्जादायीचं असते. त्यामुळे अशक्त आणि मरगळ भरलेली आहे अशांना ते उपयुक्त ठरते.
- पंचामृतामुळे तणाव दूर होतो. दूध आणि तूप हे बुद्धिवर्धक असते, दररोज एक चमचा पंचामृत घेतलं तर अर्धशिशी बरी होईल.
गूळ-खोबरे
- बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे गूळ-खोबरे.
- नैवेद्य म्हणून वापरले जाणारे गूळ-खोबरे शरीराला अतिशय गुणकारी आहे.
- यात उपयुक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतूमय पदार्थ असतात.
- गुळात लोह आणि पोटॅशियम असतं.
- त्यामुळे हिमोग्लोबीन वाढवायला मदत होते.
- त्यातील ऍण्टी ऑक्सिडंट शरीराला आरोग्यदायी असतात.
- खोबर्यात मुबलक तंतूमय पदार्थ आणि उपयुक्त स्निग्ध पदार्थ असतात.
- मोदकाचे व करंजीचे सारण करताना गूळ-खोबर्याचे मिश्रण वापरतो.
- खोबर्यामुळे गुळातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करणं सोपं जातं.
- मधुमेह्यांनीही हे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले तरी नुकसान होत नाही.